316
फट
तर समजा की
कविता म्हणजे एक बोट
चाचपडतंय एक फट
अंधुक शक्यतेची,
तुरुंगातील एखादा चमचा जसा
खरवडतो जमीन: एक भुयार,
स्वातंत्र्याची संदिग्ध कल्पना
याच आपल्या जगात
सोमालियातील (सोमालिया हा एक प्रदेश आहे; होय, याच आपल्या जगात)
दहा वर्षीय मुलीचे
अत्यंत व्यक्तिगत जीवन;
तिचे योनिलिंग आणि चीरीटोप काढून टाकले आहेत
आणि योनी मुख शिवून टाकले आहे,
फक्त लघवी आणि पाळीच्या रक्तासाठी
एक लहान छिद्र ठेवले गेले आहे
जोपर्यंत तिच्या दोन पायांमधील त्वचा नव्याने उगवत नाही
तोपर्यंत ती अशीच राहील जखडून
आणि ज्या दिवशी ती येईल वयात
तिचा नवरा
विंâवा समाजातील एखादी प्रतिष्ठित स्त्री
पुन्हा उघडेल तिला,
चिरेल पुन्हा
चिरतात जसे फळ
विंâवा उघडतात जसा
महत्त्वाचे कागद असलेला
लिफाफा
जसे विमान चिरत जाते ढग
जसे ढग चिरत जातात आभाळ