Home दिवाळी 2021आबरा का डाबरा पुस्तकरावांचा इझम

पुस्तकरावांचा इझम

बऱ्याच लोकांना पुस्तके विकत घेण्याचा छंद असतो. हा छंद जिवाला पिसे लावलेल्या काहींना पुस्तके अभिमानाने चोरायचाही छंद असतो. पण काही लोक नुसतीच पुस्तके विकत घेतात, वाचत नाहीत आणि घरात पुस्तकांचा ढीग मांडतात, इतका, की डोकं सुन्न होऊन जाईल, त्या व्यक्तिचं, तिच्या घरातील लोकांचं व समाजमाध्यमातून ढिगारा शो केल्याने त्या व्यक्तीच्या फ्रेंड्सचं- एकदम सुन्न डोकं- यावरून कदाचित जपानी लोकांनी अशा लोकांना उद्देशून (Tsundokuu) त्सुनडोकु हा शब्द शोधून काढला असावा. बऱ्याच प्रकारच्या लेखक विचारवंतांनी पुस्तके जमवण्याच्या छंदाला खूप बॅण्डविड्थ खर्च करून ऑस्समनेसच्या पायरीवर ठेवल्याने हा छंद व्यासंगीपणाचे/विद्वत्तेचे एक लक्षण बनले आहे. कुणी एखादे दुर्मीळ अथवा त्याच्या दृष्टीने `अत्यंत महत्वाचे’ पुस्तक ऑनलाइन शो केले की हे आहे माझ्याकडे असे सांगताना बॉर्डरलाइन ऑरगॅसमीकआनंद होतो किंवा `हे मला हवेच हवे, म्हणजे हवेच’ असे स्वत:ला आणि जगाला ठसवून व्यासंगपूर्तीचा निर्वाण हे लोवâ अनुभवतात असे ज्ञानी लोक सांगत असतात. पण हल्ली तंत्रज्ञान प्रसार व इतर मनोरंजक कारणांमुळे पुस्तक वाचायला घेतले की बोटे पाने स्वाइप करायला शिवशिवतात आणि बिनवाचीत पुस्तकांचे ढिगारे समाजमाध्यमांवर झळकत राहतात. कुणी त्सुनडोकु लेखक, विचारवंत निवर्तल्यावर, वर्तमानपत्रात अशी बातमी देता येईल का? श्रीयुत पुस्तकरावजी यांचे निधन झाले. ते पंचेचाळीस वर्षांचे होते, त्यांच्या मागे, पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि खूप बिनवाचीत पुस्तके आहेत. तर हे असे आहे.

—————————————-

चिपको, आंदोलनातले लोक

ह्यांना यांच्यामागे चिपको म्हणून ओळखले जाते कारण हे सगळीकडे चिकटण्याचा प्रयत्न करतात. हे लोक शक्यतो अष्टपैलू असतात. यांना वेगवेगळ्या उच्चभ्रूंच्या किंवा कोणत्याही भ्रूंच्या गटाला चिकटायला आवडते. संगीतातले यांना कळते, क्रिकेटमधले यांना कळते, कब्बडी आणि पिपाणीवादनाच्या क्षेत्रातही यांना गती असते. कविता हा तर यांचा खास विषय. नामवंत कवी, चित्रकार, नाटककार यांना हे इंडिाव्हिज्युअली धरून असतात. चित्रकला, नाटक, लघुपट, कादंबरी आणि त्यातले जॉनर्स हे तर यांच्या डाव्या हाताचा मळ. शिवाय हे चित्रपटाचे दर्दी असतात. हे स्वत: दुसऱ्याबाबत कंâजूष असले फुकट मिळालेली दारू यांना चांगलीच मानवते. हे लोक एथनिक कपडे घालतात आणि परदेशातल्या मित्र किंवा मैत्रिणीकडून हिकमतीने मिळवलेली शुद्ध चामड्याची एखादी तरी वस्तू बाळगतात. स्वत: अगदी टुकार लिहितात पण मूल्यमापन मात्र सगळ्यांचे करतात. हे शक्यतो वेगवेगळ्या कलासमूहात घुसून व्यावसायिक कामे आणि फुकटी प्रतिष्ठा पदरात पाडून घेण्यात पटाईत असतात. चित्रकारांमध्ये हे साहित्याविषयी बोलतात आणि कवींमधे तारकोव्हस्की वगैरेंविषयी. त्यामुळे प्रथमदर्शनी मंडळी यांच्या अष्टपैलूपणाने अचंबित होतात. पण नंतर स्वत:च्या नशिबाला दोष देतात- अचंबित झाल्याबद्दल. यांना प्रसिद्धी, पुरस्कार आणि एनकॅशमेंट आवडत नाही पण मिळाली तर हवी असते. अशा लोकांचे नाव कालांतराने चिपको पडते.

लेडीज आणि जेंट्स अशा दोन्ही लिंगात हे लोक आढळतात…

—————

लोका सांगे

गेट आहे. गेटच्या आत पार्किंग आहे. पार्किंगच्या शेजारी रिक्रिएशन हॉल. तिथ मुद्दाम एक्झोरा आणि कॅक्टस लावलेले आहे. आप्पातात्यांच्या सुनेची (`वेणी’ नाव तिचं – छानैनं नाव?)

गाडी तिथेच लावलेली असते. त्यांचे मित्र तात्याआप्पा समोरच राहतात. आज तिकडून फार आवाज येत होते. खूप कालवा चाललावता. आत्ता थांबेल मग थांबेल म्हणलं तर थांबायचं लक्षण दिसेना. बरं दोघं घट्ट मित्र. दोघांचेही आवाज चढलेले. दोघांच्या बाजूला पाचदहा पाचदहा समर्थक जमलेले. लतादीदींचा आज वाढदिवस म्हणून गाणेप्रेमींनी रिव्रिâएशन हॉलमध्ये केक कापायला ठेवलेला. सगळं भयंकर मंगलमय चाललंवतं पण नेमकं तात्याआप्पांना दीदींचं `ए मेरे वतन वेâ लोगो’ लावायची बुद्धी झाली आणि आप्पातात्यांचं पित्त खवळलं. कारण त्यांना लावायचं होतं `सागरा प्राण तळमळला’. दोघांची आणि दोघांच्या समर्थकांची जोरदार जुंपलीच होती जणू. बरं दोघंही तगडे लताप्रेमी. त्यामुळे एकदम टफ. कोणाला हार जाणाऱ्यातले नाही. कोणाची डाळ शिजू देणाऱ्यातले नाही. एकमेकांना अर्बन नक्षल आणि भक्तगणंग म्हणण्यापर्यंत दोन्ही बाजूंची मजल गेली.

प्रकरण   हातघाईवर   येऊन   केकचा  सत्यानाश   होऊ   नाही   म्हणून   सिक्यूरिटीचे  संजय  तिवारी आणि

राजू बलकवडे दोघंही वॉचमन मधूनमधून व्याकूळ होत होते. शेवटी बाबूने एक अफलातून शक्कल काढली. त्याने सुचवले की आप्पातात्यांनी `ए मेरे वतन वेâ’ लावण्याआधी सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळाल्याबद्दल सरकारचे आधीच आभार मानण्याचा ठराव मांडावा आणि तात्याआप्पांनी तो प्रस्ताव स्वत:च्या सहीनिशी थेट महामहीम राष्ट्रपतींकडे शिफारसीसाठी पाठवून `सागरा प्राण…’ लावावे. अशाप्रकारे दीदींचे अभिनंदन करून केक कापावा. या सूचनेनंतर दहा मिनिटांत घटनास्थळ रिकामे झाले. इतके भारी असतात बाबूचे तोडगे!

– लोकासांगे सहनिवास सोसायटी, पर्ल अ‍ॅण्ड सारा डेव्हलपर्स.

रतन सोमण-पार्कर, केम टू हिज ग्रॅनीज् कंट्री इन २०३०.

वरून काड्यापेट्यांचे ढीगच्या ढीग वाटतील अशा एकसारख्या इमारतींचे अफाट वाळवंट बघून `श्रीमद नथ्थुरामय्या आंतरराष्ट्रीय विमानपत्तन प्राधिकरण’च्या भव्य विमानतळावर उतरताच दोन गदाधारींद्वारे त्याची रवानगी एका मोठ्या पॅव्हेलियनमध्ये झाली आणि त्याला २०४ हा नंबर देण्यात आला. इथून पुढे काही दिवस अभ्यागत क्र. दोनशेचार हीच रतनची ओळख असणार होती. रतनला घेण्यासाठी त्याचे व्हेंडर योगीराम विवेकरसायन संवर्धनचे विपणन व्यवस्थापक श्री.अ.स. क. २.ब.१७६. नावाची व्यक्ती येणार होती. ह्या देशात माणसांना नावे देण्याची पद्धत बंद होऊन कैक वर्षे लोटली होती. आता माणसांना, स्त्री असो वा पुरुष, त्यांना नंबरने ओळखले जाते. थोडा वेळ वाट बघून त्याने खिशातून मोबाईल काढला आणि श्री. सतरासाठ यांना फोन लावला. बटण दाबताक्षणीच स्क्रिनवर अक्षरे झळकली, `आपला हातसंच प्रतिबंधित आहे. कृपया जवळच्या ताईकिंवा दादाशी संपर्क करा. ‘ रतनने इकडेतिकडे बघताच अनाऊन्समेंट झाली `टोकन क्र. दोनशेचार कृपया उजव्या बाजूच्या खिडकीवर संपर्क साधा’. रतन त्या रांगेत उभा राहिला. आजूबाजूचे ताई-दादा विमानतळावर गरबा आणि ढोल पथकांचा सराव करत होते ते बघता बघता दोन तास चुटकीसरशी गेले आणि रतनचा नंबर आला. खिडकीताईने मंजूळ आवाजात विचारले `कोणाला फोन लावायचा आहे?’ रतन उत्तरला `व्हेंडरला. श्री. सतरासाठ यांना’. असे सांगताक्षणीच खिडकीताई मागे वळून गायब झाली आणि अवघ्या दीड तासात झटकन परत आली. तोपर्यंत वेदकालीन ऋषी बाबा देवमुनीराज यांचे खूप मनोरंजक व्याख्यान मोठ्या स्क्रिनवर चालू होते. ते बघत बघत पॅव्हेलियनमधले रतनसारखे अडीचेक हजार उतारू कपालभाती करू लागले. रतनला ते बघत उभ्या उभ्याच डुलकी लागली. `याला स्तंभशवासन म्हणतात’ असे एका मंजूळ भाषेत बोलणाऱ्या गोड दादाने जवळ येऊन कानात सांगितले. अध्र्या तासाच्या आत करारी खिडकीताईने निश्चयी चेहेऱ्याने रतनला सांगितले की, त्याला घ्यायला येणारे श्री. सतरासाठ हे वरिष्ठांनी जलपानासाठी बोलवल्याने वरिष्ठ कार्यालयात गेले आहेत आणि त्यामुळे येऊ शकणार नाहीत. रतन काहीसा आनंदानेच बाहेर आला, कारण ह्या देशात आनंदाशिवाय कोणत्याच भावनेला परवानगी नव्हती. कमी आनंद, जास्त आनंद, जास्त कमी आनंद, कमी जास्त आनंद, कमी कमी आनंद, जास्त जास्त आनंद अशा उपभावनांना परवानगी असली तरी मुख्य भावना आनंद हीच हवी. याशिवाय द्वेष नावाच्या भावनेलाही परवानगी होती, पण त्याचा कोटा सरकारी संघटना ठरवून देत असे. तो विशिष्ट कालावधीपुरता आणि विशिष्ट गोष्टींविरुद्ध वापरण्यासाठीच असे आणि त्याचे आरटीओसारखे लायसन्स काढावे लागे. गंमत म्हणजे वाहन चालवायला मात्र ह्या देशात परवाना लागत नाही. बाहेर पडताच सर्वत्र काड्यापेट्यांसारखे मनोरे मनोरे. सगळे रस्ते सारखे. मोटारी फारशा नाहीच. आहेत त्याही सगळ्याा एकाच रंगाच्या. एकाच मेकच्या. एकाच डिझाइनच्या. एकाच कंपनीच्या. एकच मॉडेल. ह्या देशात वेगवेगळी शहरे नाहीत. सगळं मिळून एकच शहर. आणि तेही मेट्रोने जोडलेलं. लोकांना वाहनांची गरज कमी पडते, कारण लोकांच्या घराघरातून मेट्रो गेलेली आहे. सगळ्यांची घरेसुद्धा आतून मेट्रोने जोडलेली. इतकी मेट्रो आहे इथे. बाहेर पडताक्षणीच रतनला एका मोटारवाल्याने हात करून थांबवले. रतनने नाव सांगताच, मोटारवाल्याने बसा म्हणून सांगितले. श्री. सतरासाठ हे वरिष्ठांकडे जातो म्हणून सांगून ज्या बारबालाताईंकडे बसले होते तिथे आणून सोडले. रतन थक्क. मोटारचालक म्हणाला तुम्ही समजता तसे आम्ही काही नुसते कॅबचालक नव्हे. आमच्याकडे तसे नुसते कोणीच असत नाही. आम्ही संघटनेचे कार्यकर्ते. आम्हाला खास हे चालकाचे काम दिलेले असते. शहरात कोण येतंय कोण कूठे जातंय हे नोंदवण्यासाठी सरकारने ही सोय केलेली आहे. त्यामुळे इथे कोणीच हरवत नाही आणि हरवलं तर कोणीच सापडत नाही!! एंजोय …. कथा समाप्त!!

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept