निर्गमन
काय करता तुम्ही जेव्हा तुम्हाला सापडतो
एक नवा शब्द?
तंतुपट्ट हा शब्द आज मला सापडला
तंतुपट्ट म्हणजे मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांना जोडणारा
एक अरुंद पूल
मुळात तंतुपट्ट म्हणजे कणखर, हळूहळू कळले मला
रूपके शोधणाNया, उपमा साठवणाNया कवींना
कोण रोखणार
शब्दांना वापरण्यापासून पुरेपूर?
मोझेसने आपली काठी उंचावली
आणि केले विलग
तांबड्या समुद्राला
मी विचार करत्येय,
उंचवावा एक शब्द
माझ्या तंतुपट्टावर
आणि क्षणभर का होईना
विलग करावेत
मेंदूचे डावे
आणि उजवे गोलार्ध
काय असेल तो
शब्द?
दुसNया शब्दांत,
काय तोडू शकते मला?
मोझेस पॅâरोपासून पळत होता,
मी कोणापासून पळत्येय?
माझ्या डोक्यात रक्त चढते
आणि मला जाणीव होते
मी नाही लिहू शकत पाण्यावर,
या शतकाचा चमत्कार
शिवूâ लागला आहे
स्वत:त समाधानी राहण्याची कला
आठवणी म्हणजे कथा नव्हेत
बुडत्या बोटीवर आम्ही तिघे जण
आमच्यापैकी एकीला नाव नव्हते
विंâवा कदाचित तिला सांगावेसे नाही वाटले
पण मानवी परंपरेला अनुसरून आम्ही तिला
काहीतरी
नाव दिले.
‘सगळ्यांनाच’, ती पुटपुटली,
‘सर्व गोष्टींना,
नाव असलंच पाहिजे का?’
काहीतरी घाबरली होती
आमच्यापैकी एक झाली तर?
आणि आम्ही भेदरलो होतो
नाही झाली तर?