राग
Collapsifera indica
कोल्लॅप्सिफेरा इंडिकाच्या
झुकणार्या सावलीत
ह्या देशाचे भाग्य
आज वाचले जात आहे
कसल्या रागाने
ओसंडून वाहतंय पित्त
कसल्या रागाने
पडलाय नशेत धुत्त
कसल्या रागाने
देतोय गर्जना कहरचा
कसल्या रागाने
फुललेलाय स्वत:लाच खाऊन
हा कसला राग
उभा आहे बिनविरोध
कसला हा राग?
प्रोटेस्ट
(सुधीर पटवर्धन यांस)
गेटवर ठेवलाय हात
मुठीत धरलाय दगड
फलकावर ठेवलाय हात
मुठीत धरलाय दगड
ध्वजाभोवती ठेवलाय हात
मुठीत धरलाय दगड
लाठीभोवती ठेवलाय हात
मुठीत धरलाय दगड
धर दगडातून हळूच सुटणार्या
श्वासाची चकमक-धार स्पष्टता
वानर
शरीराचे महत्त्वपूर्ण भाग ऑन डिमांड डाऊनलोड केले जाऊ शकतात
फाडा बॅनर
कफन रफू करा
गालिब आवाज उठवतो – बनवू शकाल तर माणूस बनवा
डोळ्यांवर पट्टी बांधून चालवा त्याला गर्दीतून
सापासारखा वळवळणार्या दारूगोळाच्या ट्रॅक्सवर
एक शेवटचा टाका हवाय, येईल बटण लावलेल्या कातड्याला आकार
बोलणार्या वानराचा बनवू शकाल तर माणूस बनवा