Home August 2022 स्वप्नील चव्हाणच्या पाच कविता
स्वप्नील चव्हाणच्या पाच कविता
उदाहरणार्थ पांडुरंग सांगवीकर

काही माणसं

आपल्या रंध्रारंध्राशी, पेशीपेशींशी

अदृश्य संधान जुळवून

दबा धरून बसलेली असतात

वयाची ऋतू ओलांडून पुढे जाताना

विशिष्ट वळणावर ती झडप घालतात

बेमालूम आपल्यावर

बसतात वेताळासारखी मानगुटीवर

उदाहरणार्थ पांडुरंग सांगवीकर

पांडुरंगा

विसरू म्हटलं तरी

विसरता येत नाही तुझं अस्तित्व

तुझं अस्तित्व म्हणजे तरी काय?

किंवा

मुळात अस्तित्वच म्हणजे काय?

सततच्या अधांतरीपणाचा चिरंतन शाप

भाळीच्या भळभळत्या जखमेसारखा जपणारा तू

एकटेपणाचं थंडगार पातं

रक्तात खोलवर खुपसून घेणारा तू

तुझा दंश शरीरभर पसरत जातो

अधांतरीपणाच्या आंधळ्या रंगभूमीवर

जीवघेण्या एकटेपणाचं नि:शब्द स्वगत

दीर्घ अशा पॉजमध्ये बडबडायला लावतो

सांगवीकरा

तू खरंच वेताळ आहेस बाबा

इतक्या सहजी

तुला पाठीवरून वाहून नेता येणार नाही

आणि खिळखिळ्या झालेल्या भंपक मणक्यानिशी

आम्हांला देखील

राजा विक्रमादित्य होता येणार नाही

त्यामुळे तू असाच लोंबकळत रहा

कोसलाच्या पारंबीवर

मेंदूच्या हजार शकला करून टाकणाNया

तुझ्या वेताळप्रश्नांपासून सुटका करून घेण्यासाठी

आम्ही स्वत:भोवती, स्वत:च्याच लघवीचा

भलामोठा वर्तुळ काढून घेऊ

आणि शून्यपणाच्या त्या सुरक्षित पोकळीत

जन्मभर गर्गरत राहू

आणि कधीकाळी विरंगुळा म्हणून

आमच्या भल्यामोठ्या शून्यमय पोकळीतून

कोसलाच्या पारंबीवरचं तुझं अधांतरी लोंबकळणं

दात विचकत पाहत राहू…

 

बापाचे पाय दरोज आपल्या बेरोजगार पेकाटात

सदतीस वर्षे नितनेमानं

म्युन्सीपाल्टीच्या पायNया झिजवलेले

बापाचे पाय दरोज आपल्या बेरोजगार पेकाटात

इमानेइतबारे वर्षानुवर्षे केलेली गपगुमान खर्डेघाशी

कॉलर व्हाईट ठेवून निवृत्तलोची अहंयुक्त पुâकट मिजास

कॉलर व्हाईट आन् टाईट ठेवण्यात आयशीचाही होता मुकाट वाटा

हयातभर कशाचीच कुरबुर न करणाNया सोशिकपणाचा

हे सपशेल विसरून कोडगा झालेला अस्तो बाप

तंबाखूजन्य थुंकी कसोशीने संभाळत

दिवसातून धादा तोंडावर चंबू उचकाटतो

हे माझं घराए. मी म्हणेल ते नसेल कुबूल तर

चालतं व्हायचं घरातून. तिकडं भोसड्यात जावा.

आयतं गिळून इथं रुबाबण्याचं कारण नाय.

आपले सुशिक्षित बेरोजगार हात कुल्ल्यावर

कान बधिर होऊन ऐकत राह्यतात

आईनं मुकाट गिळून टाकलेला आणखी एक कितवातरी आवंढा

तळवे मळत राह्यतात जालीम चुन्यासकट गायछाप

पोरींना चुंबणार्‍या वयातले ओठ पुâकत राह्यतात

उधारीवर सस्त्या शिगारेटी तिंपाट टपरीआडोशाला उकिडवा बसून

घर आपलं असून आपलं म्हणता येत नाहीच्या जमान्यात

मेंदू घरघरत राह्यतो कायम दगडी घरोट्यासारखा

ज्यातून पीठ पडत राह्यतं भुरभुरत

आपल्या आहिस्ते खल्लास होत चाल्लेल्या उमेदीचं

गांडफाडू डिग्र्यांच्या नावानं मातम करायच्या बेभरोशी दिवसांत

छटाकभर सुखुन एकाच गोष्टीचा वाटत राह्यतो की

एक दिवस आयशीला पाठीशी घालून बापाच्या नजरेसमोर

आपण धटिंगणागत कुल्ले उडवत बापाच्या घराला

त्याच्यासकट कायमचा रामराम ठोकू माज करत

पुन्हा थोबाड पाहणार नायच्या टणक शपथेवर

वर टोला खाले निवाला जिर्वत एकेक दिवस लोटताना

ह्या रांडेच्या एवढ्या बड्या पृथवीवर

वांझोट्या डिग्र्यांना पुरतं गाभण करत

जिथं उरलंसुरलं स्वत्व शाबूत ठेवून गिळतानिजता येईल

एवढं खोपट्याएवढं घर करता येत नाहीए आपल्याला

 

कोलंबस

शहरातील रंगीत खेळण्यांशी

खेळून झाल्यानंतर

कुठलासा अमर्याद थकवा

सारखा टकरा देत राहतो खोलवर

हाडांमधून थेंबाथेंबानं पाझरणारा

अमर्याद थकवा

झाकोळलेला विस्तीर्ण दिशाहीन सागर

आंधळ्या पाण्यात लोटलेल्या तारुवर

मलूलपणे श्वास ऐकत पडून असलेला

एकटा

कोलंबस

 

काळाचा थंडथिजला डोळा

काळाचा थंडथिजला डोळा

पापणीचे केस झडून गेलेला

कधींचा उघडामिट्ट सताड

बुबुळावर शेवाळला तवंग

त्यावरून पाय घसरून पडतो

एका मरणथंड शवागारात थेट

जिथं खच आहे प्रेतांचा ओळीने

चेहरे झाकलेले कधींचे बेवारस

अंगठ्याला नंबर्स कसलेसे सांकेतिक

कसलाच काय अर्थबोध होत नाही

आपण इथं का आलोय प्रयोजनशून्य

मरणाची थंड बधिर शांतता हाडामाजी

शांततेला तडा देऊन आरडावंस वाट्टं

नेमक्या त्याच मोक्याच्या क्षणी जीभ निखळून पडते

जीवाच्या आकांतानं धावत सुटावं वाट्टं

पळण्यापूर्वी निखळून पडलेल्या जिभेला

शोधून खिशात टाकून घेऊन जावं वाट्टं

हात चाचपत राहतात थंडगार लादी सपाट

पण कायकेल्या सापडत नाय मांसल जिव्हा

जिव्हारी तडे जातात जेव्हा उंदीर कुचकुचत

जिभेचा मांसल गोळा बिळात घेऊन पळतो

पाय चिटकलेले घट्ट धावण्यास नाकुबूल

काळाचा थंडथिजला डोळा गिळत जातो सावकाश

आपल्यासकट थंड ओल्या शांत मृत्यूचं शवागार

 

आभाळ सांधायला निघालेला बंड्या

बंड्याचा बाप वारला

दारूत लिव्हर सडवून

मसणात एक सुद्द इसम

शोकसभेच्या सुद्द साच्यात बोल्ला

आज अमुकअमुक परिवारावर

दु:खाचा डोंगर कोसळला आहे

बंड्या माझ्या शेजारीच उभा

न राहवून कानात खुसपुâसला

भेनेचोद डोंगर कोसळलाय

की उरावरचा धोंडा हललाय

शोकसभेचा म्होरक्या इसम सुद्द

तर अमुकअमुक परिवाराचं

साक्षात आभाळ फाटलं आहे

ईश्वर मृतात्म्यास शांती प्रदान करो

आणि कुटुंबीयांस आभाळ सांधण्याचं

बळ देवो… ओमशांतिशांतिशांति…

बंड्या बंड्या चढ वर

शिवून काढ आभाळ

अरे संभाळ संभाळ

बघ फाटली लेका चड्डी ढगाळ

ते फाटल्या आभाळाचं मरू दे

पह्यले ती गांडीवरची चड्डी शीव

नाह्यतर अशानं कॉलेजातल्या पोरींना

यायची लेका तुझी उगाच कीव

शीव शीव पह्यले चड्डी शीव

बंड्या बंड्या ही धर सुई

संभाळ च्युभेल संभाळ

मंग करशील फुकट ऊईऊई

बंड्या टेरेसवरनं मारलाय

तुज्या आयटमचा ब्रा

आयटम्म तुझी फुगलीय टम्म

धर धर वंटास कॅच

आयटम्म येण्याआधी पळ जब्रा

लाव फाटल्या आभाळाला पॅच

The Poetrywala Foundation is envisaged as a discerning and hospitable space in both digital and real-world mode for practitioners and readers of poetry and translation from India.

Copyright @2023  All Right Reserved – Designed and Developed by VR Webtek Solutions

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept