आठवतंय, तुम्हाला किंवा आपल्याला किंवा मलाकिंवा गुहावासीयांना किंवा वनवासीयांनाआकाशाखाली, नैरोबीत वा सांगलीतब्रेबॉर्न स्टेडियमच्या बाहेर, अग्निवलयांत साखळीडाव खेळताना नक्षत्रांत फिरतएक खेळ सुरू केला होता?श्वासाच्या स्पंदनाने, पृथ्वीच्या उबदार छातीत डोळे मिटून,भित्तीचित्रे रंगवून, उंबरठे ओलांडून, ओंजळीत नद्या धरूनमैदानांपलीकडे निघून जायचा खेळ!आठवतंय,तुम्हाला किंवा आपल्याला किंवा मला वा सर्वांना,कळत-नकळत, क्षर-अक्षरमध्ये पंख फडफडवतदारा-खिडकीचे बोट धरूनटेकडीच्या टोकावरुन सूर मारूनअतल समुद्राच्या मांडीत बसायलापायी चालत निघालो होतोकॅप्टन नेमोबरोबर,सबमरीनचा बिल्ला लावून!मांडला होता एक खेळ!चाळली होती पुस्तके,आणित्या पानांमध्ये वसणाऱ्या पूर्वजांच्या सोबत आठवतंय,शिबिरे उन्हाळ्याच्या सूट्टीतली?नर्सिंग होममध्ये जन्माला यायला उत्सुकजीव, सजीव अवतार, जे कान टवकारूनआपापली कथा सांगायला धडपडत होतेत्या वेळचे रसरशीत नवीन नाते हुलकावूनआरशात प्रकट झालेल्या …
Author
Prabodh Parikh
Prabodh Parikh
प्रबोध पारीख हे ज्येष्ठ गुजराती कवी, कथाकार, दृश्य कलाकार आहेत. मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. १९९३ मध्ये प्रकाशित झालेले कौन्समन (वंâसामध्ये/वंâसात) हे त्यांचे कवितांचे पुस्तक, गुजराती साहित्यातील एक महत्त्वपूर्ण संग्रह आहे. १९९३-९४चा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह (गुजरात साहित्य अकादमी) पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. १९९२-९५ मध्ये सर्वोत्कृष्ट गुजराती पुस्तकासाठी त्यांना सराफ पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कवितांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या गुजराथी कविता संग्रहाचे नौशील मेहता आणि रणजीत होस्कोटे यांनी इंग्रजीत केलेल्या अनुवादाचे पुस्तक `स्टील वॉटर' लवकरच प्रसिद्ध होत आहे. अनेक विषयांवर त्यांनी जगभर व्याख्याने दिली आहेत आणि त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत.