सत्तू
नेशनल हायवे र्प्२७ सोडल्यासरशी मुझाना रहीमच्या कोपर्यावर
कुणाले तरी सत्तू संक्रांतीची याद आली
सगळं जवा खतम झालेलं तवा चना, बाजरी आनी जवाच्या
लाडवायानी ठिवला व्हता आम्हाले जिवंत. आणिक
काबूमधी ठिवला आमच्याइतला उकळणारा राग.
याद पन दिले की येतीन कदायचीत, अच्छे दिन
सत्तूच्या बरुबर कुटायले केली आणि पानी शोधायले
निघालो आमिलोका, पन कुठं कायबी मिळेना
स्तीलायचा डब्याइतले शेवटले साहा लाडू खडखडत राहिले
जसे आमी बॉलबेिंरग घातल्यात तोंडाइत.
-हेमंत दिवटे
आपलं डेली कर्म
असं आहे ना बये, हा देश ना
गोरिंमट नाय चालवत
हा देश जुगाडनी चालतो
जुगाडसाठी पण गरज असते भो कर्माची
रखेलसाठी पण जरुरी हाय तिच्या मर्दानं काम करणं
पैक्यावाले लोक वाचतात
आमच्या नशिबी ठेवलंय फकस्त मैनत
आमास्नी किमान मैनत तर करू द्याल
तुमी करा तुमचं काम. माह्या नाकात काठी घुसवून
कानपट्टीवर पिस्तूल लावून. तुम्हास्नी काय वाटतंय
अशा भयंकर गर्मीत कुणाला कर्माचं फळ मिळणारे होय?
-हेमंत दिवटे