गावपाऊस, पूर, आम्ही व ते ईतर
पाणी हे रासायनिक संयुग असतं व त्याच गुणधर्मासहित
मग ते पावसाच्या नीच स्वरूपात बेडकांच्या र्बोेवर
पडतं.. निथळतं
चिंधीचोर मध्या, पम्या व टेंगुळ असलेला पर्हल्या
असे सगळेच भिजतात मग
माधव दुकानदार घाईगडबडीत दुकान उघडतो व
भिजलेले शेंगदाणे, गुळाच्या ढेपी, त्या ढेपिंना
चिटकलेले काळे मुंगळे बघत ओरडत राहतो
पावसाच्या आयच्या र्गोंत र्पो
त्याने दिलेल्या शिव्या खालची आळी ऐकते कारण
वार्याचा रोख त्याच दिशेला असतो
मंग आम्हीही कागदाच्या होड्या तयार करतो, न
वापरलेल्या निरोधच्या फुग्यांमध्ये पाणी भरून
एकमेकांच्या अंगावर उडवत राहतो
तेव्हा गावाला पुराचा अखंड वेढा पडलेला असतो
सुमीचा चौथा दिवस संपत आलेला असतो व तिची
आय कौसक्का तिची दृष्ट काढत असते
पंधरा
आम्हाला पंधरा पर्यंतच आकडेमोड करता येते
आमच्या मास्तरला सुद्धा तेव्हडेच अंक येतात अस
गावातील लोकं खाजगी विश्वासात बोलतात
पंधरा पलीकडील आकडे अशुभ असतात अस दात
कोरत कोरत सोपान दाजी बोलायचे
गावातील आठवडे बाजारात सुद्धा पंधराच बैलगाड्या
येतात जेथून आम्ही पिपाण्या विकत घेऊ शकतो
पंधरा दिवसाच्या चंद्रावर आम्ही आळीपाळीने मुष्तो
कारण तो उगवल्यावर दुसर्याच्या शेतातील पेरू, हरबरे
व भुईमूग आम्हाr चोरू शकत नाही
गावाच्या मधोमध तळ आहे
तळ्यात पंधरा दिवसांच्या अवकाळी पावसाने साठलेलं
तुडुंब पाणी आहे
पाण्यात मासे, शेवाळ, झिंगे व मायाळू वत्साबाईच
फुगलेलं प्रेत आहे
दरोगा अला व त्याने तो शीळा मुडदा बाहेर काढला
पंचनामा केला
मानेवरचे ओरखडे, नाकातील नथ, पैंजण, चोळी बांगडी
अश्या त्या एकूण चीजवस्तूंची संख्या पंधरा पेक्षा एकने
कमी आहे असं तो बोलला, वहीत तशी नोंद केली
व तिथे जमलेल्या आमच्या सांडासारख्या चेहर्यांकडे
बघू लागला
मंग आम्ही खूप ढसाढसा रडलो व अश्रूपात करत
राहिलो ज्यांची मोजदाद करता येत नव्हती